पिंपरी : कधी पहायला मिळणार तारांगण? सायन्स पार्कमध्ये भेट देणार्‍या मुलांचा प्रश्न

पिंपरी : कधी पहायला मिळणार तारांगण? सायन्स पार्कमध्ये भेट देणार्‍या मुलांचा प्रश्न
Published on
Updated on

वर्षा कांबळे

पिंपरी : चिंचवड येथील सायन्स पार्कच्या इमारतीजवळ तारांगण उभारले आहे. गोल घुमटासारखी असलेली आकर्षक इमारत पाहून सायन्स पार्कला भेट देणार्‍या मुलांना याबद्दल खूप कुतूहल वाटत आहे. नक्षत्र, आकाशगंगा, ग्रह हे दुर्बिणीद्वारे पाहण्यास मिळणार आहे. सायन्स पार्क पाहून झाले. आता आम्हांला तारांगण पहायचे आहे पण कधी, असा प्रश्न सायन्स पार्कला भेट देणारे विद्यार्थी विचारत आहेत.

विज्ञानविषयक आणि खगोलशास्त्र विषयक माहिती एकाच ठिकाणी विद्यार्थी आणि नागरिकांना मिळावी, यासाठी संपूर्ण भारत देशातील चार तारांगणांपैकी एक असलेल्या तारांगणाची उभारणी पिंपरी- चिंचवड महापालिकेने केली आहे. सध्या तारांगणाचे काम पूर्ण झाले असून, फक्त उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

मुंबईतील नेहरू तारांगणाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडच्या सायन्स पार्कमध्ये ऑप्टो- मेकॅनिकल आणि 2 डी डीजिटल तारांगण प्रणाली असलेल्या हायब—ीड कॉन्फिगरेशन सिस्टम प्रकारचे तारांगण उभारले आहे. यात 150 जणांची बैठक व्यवस्था आहे. हे तारांगण उभारण्यास एक ते दीड वर्षाचा कालावधी लागणार होता. तारांगणाचे काम 2018 साली सुरू झाले. तारांगणाच्या वरच्या बाजूस सुसज्ज असा 15 मीटरचा डोम (घुमट) आहे. मात्र, डोमच्या आतील भागात वापरण्यात येणारी सामग्री जपानमध्ये तयार करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे डोमच्या आतील भाग तयार करून भारतात आणण्यासाठी वेळ लागला. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा अधिकचा वेळ या कामासाठी लागला.

कोरोनामुळे कामात अडथळा

त्यानंतर कोरोनाकाळात दोन वर्षे काम पूर्णपणे बंद होते. कारण तारांगणातील ज्या काही तांत्रिक बाबी होत्या, त्यासाठी इतर देशातील अभियंत्यांना बोलाविण्यात आले होते. सर्व यंत्रणा बसविण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आले होते. कोरोना भारतात येण्यापूर्वी इतर देशात त्याचे प्रमाण वाढले होते. सरतेशवेटी मार्च महिन्यामध्ये संपूर्ण भारतात लॉकडाऊन झाले. त्यानंतर अनलॉक काळातदेखील त्यांना शहरात यायला उशीर लागला आणि तारांगणाचे काम लांबणीवर पडले. तारांगणास तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ
शकला नाही.

तारांगणामध्ये आहे तरी काय ?

शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक व विद्यार्थी यांना खगोल शास्त्राची माहिती तसेच आकाशगंगा, पृथ्वीवरील वातावरण, वातावरणातील बदल, आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, ग्रहण आदीविषयी प्रत्यक्ष ऑप्टो-मेकॅनिकल आणि 2 डी डीजिटल तारांगण प्रणाली असलेल्या हायब—ीड कॉन्फिगरेशन सिस्टमद्वारे प्रत्यक्ष अनुभवातून माहिती मिळणार आहे. या हेतूने पुणे जिल्ह्यामध्ये प्रथमच हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. तारांगणामध्ये सात प्रोजेक्ट आहेत. तारांगणांचे बाहेरचे डोम काचेचे आणि आतील अ‍ॅल्युमिनियमचे बनविण्यात आले आहे. तारांगणाचा एकूण खर्च 11 कोटी 12 लाख 43 हजार इतका आहे.

शालेय सहलीमध्ये आम्ही अनेक वेळा सायन्स पार्क पाहिले आहे. त्याच्या शेजारीच तारांगण उभारले आहे. हे डीजिटल प्रणालीचे तारांगण असणार, असे आम्हांला कळाले तेव्हापासून आम्ही हे कधी सुरू होणार याच्या प्रतीक्षेत आहोत.

                                                -हर्षदा टोपे, विद्यार्थिनी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news