पिंपरी : तरुणाच्या अंगावर रिक्षा घालून जिवे मारण्याचा प्रयत्न; बहिणीवरही कोयत्याने वार | पुढारी

पिंपरी : तरुणाच्या अंगावर रिक्षा घालून जिवे मारण्याचा प्रयत्न; बहिणीवरही कोयत्याने वार

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : जुन्या भांडणाच्या कारणावरून सात जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. तरुणाच्या अंगावर रिक्षा घालून सुमारे 60 फूट फरफटत नेले. दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी आलेल्या तरुणाच्या बहिणीच्या डोक्यात कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार गुरुवारी (दि. 20) रात्री यशवंतनगर, पिंपरी येथे घडला.अनंत डेंगळे, दीपक कांबळे, नवनाथ डेंगळे, साहिल वाघमारे, तीन महिला (सर्व रा. यशवंतनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शंकर संभाजी चौधरी (23, रा. यशवंतनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून फिर्यादीच्या अंगावर रिक्षा घालून त्यांना 50 ते 60 फूट अंतर फरफटत नेले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दहशत निर्माण केली. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले. दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांची बहिण आली असता आरोपींनी फिर्यादीच्या बहिणीच्या डोक्यात कोयता मारून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

Back to top button