पुणे: अक्षय्य तृतीयानिमित्त दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य | पुढारी

पुणे: अक्षय्य तृतीयानिमित्त दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य

पुढारी ऑनलाईन: साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला तब्बल 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला आहे. यानंतर ससून रुग्णालयातील रुग्णांना आणि सामाजिक संस्थांमध्ये या आंब्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

अक्षय्य तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला फुले व आंब्यांनी सजवण्यात आले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे.

तसेच अक्षय्य तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयूग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आज गणपती बाप्पांना 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला आहे. ही आब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती.

Back to top button