पुणे विभागात सात हजार कोटींची ‘जलजीवन’ची कामे | पुढारी

पुणे विभागात सात हजार कोटींची ‘जलजीवन’ची कामे

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पुणे विभागातील पुण्यासह, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष 2022-23 या कालावधीत सुमारे 283 पाणी पुरवठा योजना पूर्ण केल्या आहेत. त्यासाठी 7 हजार 35 लाख 992 कोटी 28 लाख रुपयांचा खर्च झाला आहे. सर्वात जास्त योजना पुणे जिल्ह्यात (168) राबविल्या आहेत. त्यासाठी 4 हजार 80 लाख 655 रुपये 10 हजार रुपये खर्च झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वात कमी म्हणजेच केवळ 15 योजना राबविण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी 616 कोटी 20 लाख 60 हजार एवढा खर्च आला. अजूनही विभागातील काही भागांत जलजीवन मिशनची कामे सुरूच आहेत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विभागामार्गत पुणे विभागातील ग्रामीण भागात जलजीवन मिशनच्या ‘हर घर जल’ या अभियानांतर्गत नव्या आणि जुन्या पुनरुज्जीवनाच्या अशा एकूण पाणीपुरवठा योजना राबवण्यात येतात. या अभियानांतर्गत प्रत्येक घरी पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजना, जुन्या पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन, क्षमतावाढ किंवा दुरुस्ती अशी कामे प्राधान्याने करणे अत्यंत आवश्यक असते. त्यानुसार या कामांचे विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करणे, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता देऊन निविदा प्रक्रिया राबवण्यासह कार्यादेश दिलेली कामे गतीने पूर्ण करणे अपेक्षित आहे. तसेच या कामांना गती देऊन ती पूर्ण होण्यासाठी जि. प. अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या अभियंत्यांनी गांभीर्याने प्रयत्न करणे आवश्यक असते. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सहकार्याने ही योजना पूर्ण करण्यावर भर देण्यात येतो.

Back to top button