Pune Rain Update: पुण्यात काही भागात गारांचा पाऊस सुरु | पुढारी

Pune Rain Update: पुण्यात काही भागात गारांचा पाऊस सुरु

पुणे : पुण्यात मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यातील काही भागात मेघगर्जनेसह गारांसह पाऊस होत आहे. दुपारी अचानक सूर झालेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे. पावसाच्या सरी कोसळताच अनेक जणांनी आडोश्याकडे धाव घेतली.

शहरात ढगांच्या गडगडतात पावसाला सुरवात झाली आहे. आज सकाळपासूनच शहरात काहीसं ढगाळ वातावरण झाले होते. दुपारी पावसाची चिन्हे दिसू लागली होती. अखेर ३ च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. शहरातील काही भागात गारांसह पाऊस होत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Back to top button