बचत प्रमाणपत्राद्वारे मिळणार महिलांना फायदा | पुढारी

बचत प्रमाणपत्राद्वारे मिळणार महिलांना फायदा

मिलिंद शुक्ल

पिंपरी (पुणे): महिला आणि मुलींसाठी सरकारने टपाल खात्यातर्फे खास योजना महिला सन्मान बचत प्रमाणपत्राद्वारे दोन वर्षे कालावधीत व्याज देण्यात येणार आहे. 1 एप्रिलपासून ही योजना टपाल खात्यातर्फे सुरू करण्यात आल्याची माहिती चिंचवड येथील पोस्ट कार्यालयातील अधिकार्‍यांनी दिली. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

खाते कुठे उघडाल?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र कोणतीही महिला अथवा लहान मुलीच्या नावे पालकांना घेता येईल. योजनेतंर्गत 31 मार्च 2023 पासून दोन वर्षांसाठी खाते उघडता येईल. या योजनेत गुंतवणूकदारांना एकल प्रकारचे खाते उघडता येईल. खाते पोस्ट ऑफिस अथवा बँकेत उघडता येईल.

तिमाहीत व्याज मिळेल?

या योजनेत किमान 1 हजार रुपये आणि जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंत रक्कम मुलगी किंवा महिला यांच्या नावावर गुंतवता येते. गुंतवणूकदारांना 7.5 टक्के चक्रवाढ व्याजदराने निश्चित व्याज मिळेल. वार्षिक 7.5 टक्के व्याज तिमाहीत जमा होते.

मोठ्या कालावधीनंतर महिला सबलीकरणासाठी केंद्र सरकारने घसघशीत लाभ देणारी योजना आणली आली. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र महिला आणि मुलींसाठी घेता येणार आहे.
– के. एस. पारखी, जनसंपर्क डाक निरीक्षक, चिंचवड मुख्यालय

इतकी काढता येईल रक्कम

या योजनेत गुंतवणूकदारांना दोन वर्षांपर्यंत रक्कम ठेवता येईल. खाते उघडल्यानंतर त्यांना एक वर्षानंतर खात्यातील रक्कम गरजेच्या वेळी काढता येईल. एकावेळी खातेदार 40 टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकेल. लेखा कार्यालयात त्यासाठी फॉर्म क्रमांक 3 जमा करावा लागेल. त्यानंतर रक्कम प्राप्त होईल.
या योजनेत मुलींसह महिलांना खाते उघडता येईल. या योजनेवर 7.5 टक्के दराने चक्रवाढ व्याज मिळते. ही योजना 31 मार्च, 2025 पर्यंत सुरू राहणार आहे.

Back to top button