पुणे महापालिकेमध्ये उद्या आरोग्य अदालत | पुढारी

पुणे महापालिकेमध्ये उद्या आरोग्य अदालत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या तक्रार निवारणासाठी आरोग्यप्रमुख
डॉ. भगवान पवार यांनी ‘आरोग्य अदालत’ हा नवा उपक्रम सुरू केला आहे. आरोग्य अदालत 15 एप्रिल आणि 13 मे या दिवशी सकाळी 10 ते 2 या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. आरोग्य अदालतीमध्ये अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांच्या समस्या स्वत: किंवा संबंधित आरोग्यप्रमुखांमार्फत दाखल कराव्यात. अदालतीच्या दिवशी सर्व सहायक आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये तक्रारी किंवा समस्या निवारण करण्यासाठी नियोजन केले जाईल, असे डॉ. भगवान पवार यांनी सांगितले. सेवेत कार्यरत असणार्‍या व सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचार्‍यांना आरोग्य अदालतीमध्ये समस्या मांडण्याची मुभा असणार आहे.

Back to top button