महिला, बालविकास भवन उभारणार : चंद्रकांत पाटील | पुढारी

महिला, बालविकास भवन उभारणार : चंद्रकांत पाटील

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  समाजात महिलांना सन्मानाचे स्थान मिळावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पुणे जिल्ह्यात महिला व बालविकास भवन उभारण्यासाठी आराखडा तयार करावा, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन रजिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. महिला व बालविकास विभागातर्फे देण्यात येणार्‍या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विभागस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

आयुक्त आर. विमला, उपायुक्त राहुल मोरे, उपायुक्त दिलीप हिवराळे, संजय माने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अश्विनी कांबळे आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले की, स्वयंसेवी संस्था वैयक्तिक योगदान देऊन शासनाच्या योजना राबवितात. हे काम स्वतःच्या समाधानासाठी स्वयंस्फूर्तीने करण्यात येते. त्यांनी महिला व बालकांसाठी काम करावे.फ

पुणे विभागस्तरीय पुरस्कार
2014-15 – यशस्विनी चाइल्ड अँड वुमन डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, कोल्हापूर.
2016-17 – महिला जीवन संवर्धक मंडळ, माहेर संचालित शिशू आधार केंद्र, कोल्हापूर.
2017-18- कै. शिवाजीराव पाटील बहुउद्देशीय ग्रामविकास प्रबोधनी, शिरोळ, जि. कोल्हापूर.

पुणे जिल्हास्तरीय पुरस्कार
2013-14-विद्या शुभानंद म्हात्रे
2014-15- वंदना प्रदीप हाके
2015-16- मीना विनोद शहा
2017-18- राजश्री धनंजय पोटे

 

Back to top button