इंदापूर : आमदार निधीव्यतिरिक्त इतर कामांचे श्रेय घेऊ नका : हर्षवर्धन पाटील | पुढारी

इंदापूर : आमदार निधीव्यतिरिक्त इतर कामांचे श्रेय घेऊ नका : हर्षवर्धन पाटील

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात आता शिवसेना-भाजप युतीचे सरकार असून, इंदापूर तालुक्यात मंजूर झालेली सर्व विकासकामे केंद्र व राज्य सरकारची आहेत. शिवसेना-भाजपमार्फत मंजूर झालेली आहेत. आमदार फंड सोडून आता इतर विकासकामांचे श्रेय इंदापूर तालुक्याच्या विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी घेऊ नये, असा टोला भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरचे आमदार माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना लगावला.

इंदापूर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर रविवारी (दि. 19) झाले. शिबिर समाप्तीनंतर पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. केंद्र व राज्याच्या विविध योजना लाभार्थ्यापर्यंत पोहचविण्यासाठी प्रचार व प्रसाराचे काम प्रभाविपणे भाजप कार्यकर्ता करीत आहे, अशी माहितीही पाटील यांनी दिली. या शिबिरामध्ये कार्यकर्त्यांना भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी व केशव उपाध्ये, माजी आमदार मेधाताई कुलकर्णी, पुणे शहर भाजपचे माजी अध्यक्ष योगेश गोगावले व हर्षवर्धन पाटील यांनी विविध विषयांवर कार्यकर्त्यांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. इंदापूर तालुक्यातील भाजपचे बूथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, पक्षाचे व मोर्चांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button