पिंपरीत तरुणावर खुनी हल्ला | पुढारी

पिंपरीत तरुणावर खुनी हल्ला

पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाने तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना शनिवारी (दि. 18) रात्री साडेअकराच्या सुमारास पिंपरी भाजी मार्केट येथे घडली. विशाल मनोज लोट (26, रा. पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सलमान शेख (30, रा. पिंपरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शनिवारी रात्री जेवण झाल्यानंतर घराजवळ शतपावली करीत होत्या. त्या वेळी तिथे आलेल्या सलमान याने फिर्यादी यांना धमकी दिली. त्यांच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. तसेच, फिर्यादी पळून जात असताना त्यांना अडवून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button