पिंपरी : सराईत गुंडाच्या वाढदिवसाचा फ्लेक्स पडला महागात | पुढारी

पिंपरी : सराईत गुंडाच्या वाढदिवसाचा फ्लेक्स पडला महागात

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : सराईत गुंड नीलेश गायवळच्या वाढदिवसाचा फ्लेक्स लावणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी संबंधितांवर शुक्रवारी (दि 17) हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश गायवळ हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

दरम्यान, चांदणी चौकात नीलेश गायवळ आणि इतर दोघांच्या वाढदिवसानिमित्त अनधिकृत फ्लेक्स लावण्यात आले होते. हा प्रकार निदर्शनास येताच हिंजवडी पोलिस आणि पुणे महापालिकेच्या पथकाने कारवाई करून फ्लेक्स काढून टाकले. यापूर्वीदेखील गायवळ टोळीच्या सदस्यांनी हिंजवडी परिसरात वाढदिवस साजरा करून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला होता.

यूथ फाउंडेशनच्या सदस्यांवर गुन्हा
याप्रकरणी नीलेशभाऊ गायवळ यूथ फाउंडेशनचे सदस्य आणि इतर दोघांवर अनधिकृत फ्लेक्स लावल्याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी परवाना निरीक्षक नीलेश काळुराम घोलप यांनी फिर्याद दिली आहे.

 

Back to top button