जुन्नर शहरात बिबट्या जेरबंद | पुढारी

जुन्नर शहरात बिबट्या जेरबंद

जुन्नर; पुढारी वृत्तसेवा : जुन्नर शहरातील आगरपेठ या नागरी वस्तीच्या भागातून रविवारी ( दि.26) रात्री पूर्ण वाढ झालेला नर बिबट्याला पिंजर्‍यात जेरबंद करण्यात आले असून, एकाच ठिकाणी गेल्या चार महिन्यांत जेरबंद झालेला हा पाचवा बिबट्या आहे.
वन परिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल नितिन विधाटे, नारायण राठोड, संतोष भालेकर, संजय गायकवाड आदींनी हा पिंजरा याठिकाणी लावलेला होता.

गेल्या चार महिन्यांत आगरपेठ याठिकाणी लावलेल्या पिंजर्‍यात आतापर्यंत पाच बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेले असून, अजूनही एक बिबटा या भागात असल्याची शक्यता राज फाउंडेशनचे अध्यक्ष राजकुमार जाधव यांनी सांगितले. जेरबंद झालेल्या बिबट्याची रवानगी माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात करण्यात आली आहे.

Back to top button