पुणे: साहित्य संमेलने सरकार धार्जिणी होत आहेत, लेखक मिलिंद बोकील यांचे मत | पुढारी

पुणे: साहित्य संमेलने सरकार धार्जिणी होत आहेत, लेखक मिलिंद बोकील यांचे मत

पुणे, पुढारी वृत्तसेवा: साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून राजकीय व्यक्तींनी आपल्याला ‘मार्गदर्शन’ करावे, ही अपेक्षा चुकीची असून राजकीय लोकांपर्यंत साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून लोकमानस आणि लोकभावना पोहोचविणे अपेक्षित आहे. अशी अपेक्षा असताना अखिल भारतीय साहित्य संमेलने दिवसागणिक सरकार धार्जिणे आणि लाचार होत असल्याची खंत लेखक मिलिंद बोकील यांनी व्यक्त केली. एका पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पुढे बोलताना बोकील म्हणाले की, यंदाच्या साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षांना सरकारी पाहुण्याचा (स्टेज गेस्ट) दर्जा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आणि ती मागणी सरकारने सहज मान्य केली. अशी मागणी करणे चुकीचे असून संमेलनाध्यक्षांनी स्वतःला व्हीआयपी म्हणून सर्वसामान्यांपासून अलिप्त राहण्यापेक्षा सर्वसामान्य रसिक वाचकांमधील घटक म्हणून राहणे अपेक्षित आहे. साहित्य संमेलने सरकार धार्जिणी झाल्यामुळे ती साहित्याशी द्रोह करीत आहेत. साहित्य व्यवहाराचा विवेक हरवला असून विवेकाची जपणूक करणारी नवीन साधने शोधावी लागतील.

Back to top button