पुणे : पाटस येथील शेतकऱ्याला भूमिहीन केल्याप्रकरणी पुणे येथील तिघांवर गुन्हा दाखल | पुढारी

पुणे : पाटस येथील शेतकऱ्याला भूमिहीन केल्याप्रकरणी पुणे येथील तिघांवर गुन्हा दाखल

पाटस : पुढारी वृतसेवा : पाटस (ता. दौंड) येथील शेतकऱ्याचे दोन एकर जमिनीचे कुलमूखत्यार करून खरेदी करीत केले, पण सहा एकर शेतजमिन फसवणूक करून लुटून शेतकऱ्याला भूमिहीन केल्याप्रकरणी पुणे येथील तिघांविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही माहिती यवतचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. विलासचंद्र शिवराम तांदळे, प्रभा विलासचंद्र तांदळे व आदित्य विलासचंद्र तांदळे (सर्व रा. कोथरूड, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबतची फिर्याद पोपट लक्ष्मण माखर यांनी दिली. फिर्यादी यांचे वडील लक्ष्मण बारकु माखर यांनी विलासचंद्र शिवराम तांदळे, त्यांची पत्नी प्रभा विलासचंद्र तांदळे व मुलगा आदित्य विलासचंद्र तांदळे यांना फिर्यादी यांचे पाटस मधील गट नंबर-१३७/२० तोच (जुना गट नं.१३७/५) मधील असणारे ३.२० हेक्टर क्षेत्रापैकी ०.८० आर क्षेत्र कुलमुखत्यार व बिनताबा साठेखत दि १ नोव्हेंबर २००७ रोजी करून दिले. असे असताना आरोपी विलासचंद्र शिवराम तांदळे याने संपूर्ण ३.२० हेक्टर क्षेत्राची विक्री दि.२६ मार्च २०२२ रोजी पत्नी प्रभा विलासचंद्र तांदळे हिच्या मे साई प्रभा या कंपनीला केली आहे.

ही जमीन विक्री करीत असताना त्यांनी जमीन विक्री करण्यासाठी लागणाऱ्या कोणत्याही शासकीय परवानगी घेतल्या नाहीत तसेच कुलमुखत्यार पत्र व बिन ताबासाठे खतामधील कोणत्याही अटी व शर्तीची पुर्तता केली नाही. तसेच फिर्यादी यांचे वडील लक्ष्मण बारकु माकर हे मयत असताना हे जिवंत असल्याचे दाखवून दि २६ मार्च २०२२ रोजी केडगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खोटे घोषणापत्र तयार करून फिर्यादी पोपट माखर व शासनाची फसवणुक केली असल्याने वरील तीन आरोपीं विरोधात त्यांनी तक्रार केली. या प्रकरणी यवत पोलिसात त्यांच्या विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास यवतचे फौजदार संजय नागरगोजे करीत आहेत.

Back to top button