पुणे : कसब्यात पहिल्या दोन तासात साडेसहा टक्के मतदान | पुढारी

पुणे : कसब्यात पहिल्या दोन तासात साडेसहा टक्के मतदान

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ विधानसभा निवडणुकीला रविवारी सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली. सकाळपासूनच मध्यवस्तीतील नागरिक मतदानासाठी मतदान केंद्रांवर येत आहेत. तरुण जेष्ठ नागरिक यांच्यासह महिला देखील सकाळपासूनच मतदान करण्यासाठी येत आहेत. सकाळच्या दोन तासात कसब्यात एकूण साडेसहा टक्के मतदान झालं आहे. सध्या उन्हाचा पारा पाहता दुपारी मतदान काहीसं मंदावेल तर उन्हं उतरल्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडण्याची शक्यता आहे.

उन्हाचा पारा दुपारनंतर वाढणार असल्याने सकाळी पाहिल्या टप्प्यात नागरिक स्वयंस्फुर्तीने घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावत आहे. सकाळच्या पहिल्या टप्प्यात मतदानाला येणाऱ्या नागरिकांचा प्रतिसाद हळूहळू वाढत आहे.

Back to top button