राशीन : दोन सराईत आरोपींना करपडीतून अटक | पुढारी

राशीन : दोन सराईत आरोपींना करपडीतून अटक

राशीन; पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील करपडी येथे पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून दोन आरोपींना अटक केली.
मनचक्क्या विष्णू भोसले (वय 47) आणि मयूर मनचक्क्या भोसले (वय 22) अशी त्यांची नावे आहेत. मनचक्क्या भोसले हा उच्च न्यायालयात हजर होत नसल्याने त्याला अटक वॉरंट जारी केले होते.

त्याचा शोध कर्जत पोलिस घेत होते. खेड येथे काही दिवसांपूर्वी किराणा दुकानात चोरी करून तेलाचे डबे आणि इतर साहित्य व काही रोख रक्कम चोरून नेेली होती. या गुन्ह्यात मयूर मनचक्या भोसले यास अटक करण्यात आली. आरोपी मनचक्या भोसले याच्यावर चोरी, खून, मारामारी असे सहा गुन्हे दाखल आहेत.

Back to top button