पुणे : राजगडावर मुक्कामाला जाताय ? त्याआधी पुरातत्व विभागाचा हा नवा आदेश जरूर वाचा | पुढारी

पुणे : राजगडावर मुक्कामाला जाताय ? त्याआधी पुरातत्व विभागाचा हा नवा आदेश जरूर वाचा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पर्यटकांकडून राजगड किल्ल्यावर रात्रीच्या वेळी घाण करण्यात येत असल्यामुळे आता पर्यटकांना राजगड किल्ल्यावर मुक्कामाला बंदी करण्यात आली आहे. संदर्भातील आदेश पुरातत्त्व विभागाकडून बुधवारी (दि.15) काढण्यात आले.
वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ला राज्य संरक्षित स्मारक आहे.

येथे राज्यासह देशभरातून अनेक पर्यटक भेटी देत असतात. काही पर्यटक किल्ल्यावरच रात्री कॅम्प लावून राहतात. रात्रीच्या मुक्कामावेळी अनेक पर्यटक किल्ल्यावर घाण करत असल्याचे पुरातत्त्व विभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळे पुरातत्व विभागाने रात्रीच्या मुक्कामाला राजगडावर बंदी केली असून, या संदर्भातील अंमलबजावणी करण्याची पत्र भोर उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे.

राजगड किल्ल्यावर रात्रीस मुक्कामासाठी असणारे पर्यटक येथे चुली पेटवून, आणि परिसरात कचरा फेकून घाण करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आम्ही राजगडावरील रात्रीचा मुक्काम आजपासून बंद करत आहे.
              – डॉ. विलास पुं. वाहणे, सहाय्यक संचालक, पुरातत्त्व विभाग, पुणे

Back to top button