पुणे : शहराच्या काही भागांत आज-उद्या पाणी बंद | पुढारी

पुणे : शहराच्या काही भागांत आज-उद्या पाणी बंद

पुणे; पुढारी वृत्तसेवा : समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत टाकण्यात आलेल्या मुख्य जलवाहिन्यांवर फ्लोमीटर बसविण्यात येणार आहे. त्यामुळे आज (बुधवारी) आणि उद्या (गुरुवारी) शहराच्या काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

बुधवारी पाणी बंद राहणारा भाग : सणस पंपिंग स्टेशन : नर्‍हे, धायरी मानस परिसर, धायरी खंडोबा मंदिर परिसर गल्ली क्र. बी 10 ते बी 14. गुरुवारी पाणी बंद राहणारा भाग : चतु:शृंगी टाकी परिसर ः बोपोडी, अनगळ पार्क, खडकी, सहारा हॉटेल, राजभवन, पंचवटी, औंध, खडकी अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी, अभिमानश्री सोसायटी. पद्मावती टाकी परिसर ः बिबवेवाडी, अप्पर व सुपर इंदिरानगर, संभाजीनगर, काशिनाथ पाटीलनगर, लोअर इंदिरानगर, चिंतामणीनगर, स्टेट बँकनगर, लेकटाऊन, गंगाधाम, बिबवेवाडी-कोंढवा रस्ता, विद्यासागर कॉलनी, सॅलिसबरी पार्क, महर्षिनगर, डायस प्लॉट, मार्केट यार्ड, धनकवडी, गुलाबनगर, चैतन्यनगर, तळजाई वसाहत परिसर. नवीन कॅन्टोन्मेंट जलशुद्धीकरण केंद्र ः ससाणेनगर, काळेबोराटेनगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, वानवडी, चंदननगर, खराडी, रामटेकडी, माळवाडी, भोसले गार्डन, 15 नंबर आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेवनगर, मगरपट्टा परिसर.

Back to top button