पुणे: दुभाजकाला दुचाकी धडकून एकाचा मृत्यू | पुढारी

पुणे: दुभाजकाला दुचाकी धडकून एकाचा मृत्यू

पुणे, पुढारी वृत्तसेवा: दुभाजकाला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात तरूणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना एरंडवणा येथील डीपी रोडवर घडली. हा प्रकार 29 जानेवारी रोजी पहाटे घडला. यामध्ये अभिजीत भालचंद्र सोनवणे (25, रा. औदुंबर कॉलनी, कर्वेनगर) याचा अपघातात मृत्यू झाला. तर त्याचा मित्र गणेश माटे हा देखील किरकोळ जखमी झाला आहे.

Back to top button