कोल्हापूर : किरीट सोमय्या यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन | पुढारी

कोल्हापूर : किरीट सोमय्या यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी कोल्हापुरात येऊन पहिल्यांदा अंबाबाईचे दर्शन घेतले. मंदिर बंद असल्याने त्यांनी प्रवेशद्वारातून देवीचे दर्शन घेतले. यावेळी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, सोमय्या यांनी मध्यरात्री साताऱ्यात एंट्री घेतली. “भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करणे हा आपला अजेंडा असून त्याची सुरुवात आता केली आहे. आपल्याला कोणी कितीही अडवले तर आपण थांबणार नाही. मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करणार”, अशी तोफ डागत भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मध्यरात्री दीड वाजता साताऱ्यात एंट्री केली. त्यानंतर ते कोल्हापुरात दाखल झाले आहेत.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुरगूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या मंगळवारी कोल्हापूर दौर्‍यावर आले आहेत. दरम्यान, कोल्हापुरात मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उघड करणार असल्याचे सोमय्या यांनी मुंबईत म्हटले आहे.

जिल्हा प्रशासनाने 19 सप्टेंबरला सोमय्या यांना जिल्हाबंदी केली होती. हा आदेश सोमवारी मागे घेण्यात आला. मंत्री मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना सोमय्या यांचा दौरा शांततेत पार पडू द्या. त्यांना कोठे जायचे असेल तेथे जाऊ द्या, असे आवाहन केल्याने तूर्त तणाव निवळला असला, तरी ‘हाय व्होल्टेज ड्रामा’च्या या दुसर्‍या अंकाकडे पश्‍चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सोमय्या साताऱ्यात येणार होते. त्यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबत तक्रार देण्यासाठी व पुरावे एकत्र गोळा करण्यासाठी सोमय्या आता कोल्हापूरला आले आहेत.

यापूर्वी आठ दिवसांपूर्वी ते कोल्हापूरला निघाले असताना कराड (जि. सातारा) येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. आठ दिवसांनंतर आता पुन्हा सोमय्या कोल्हापुरात आले. तसा दौराचं चार दिवसांपूर्वी त्यांनी जाहीर केला होता.

कोल्हापूर live : किरीट सोमय्या अंबाबाई दर्शनासाठी …

Back to top button