धक्कादायक… औंध येथे संपत्तीच्या वादातून सख्या बहिणीला पेटवले | पुढारी

धक्कादायक... औंध येथे संपत्तीच्या वादातून सख्या बहिणीला पेटवले

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : संपत्तीच्या वादातून सख्या बहिणीला पेटवले. बहिणीला पेटवून देऊन खुनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार औंध येथील अनुसया सोसायटीत घडला. आरोपीच्या या कृत्यामुळे बहीण जखमी झाली आहे. सख्या बहिणीला पेटवले च्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी शरद मोहन पतंगे (45, रा. यशोधन सोसायटी, चिंतामणी नगर फेज 2, बिबवेवाडी) याला चतुरशृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत राजश्री मनोहर पतंगे (48, रा. अनुसया हौसिंग सोसायटी, औंध) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शरद आणि राजश्री हे सख्खे भाऊ बहीण आहेत. दोघांचा वडिलोपार्जित संपतीवरून वाद आहे. दोनच वर्षांपूर्वी त्यांचे आई वडिलांचे निधन झाले आहे. शुक्रवारी (दि.२४) दुपारी शरद हा दारू पिऊन राजश्री यांच्या घरी गेला. त्यावेळी त्या स्वयंपाक घरात खुर्चीवर आराम करत होत्या. त्यांच्यात पुन्हा वडिलोपार्जित संपत्तीतून वाद झाले. याच दरम्यान त्याने त्याच्या जवळील काडेपेटीतील काडीने आग लावून बहिणीला पेटून दिले.

आरोपीच्या या खुनी हल्ल्यात राजश्री या गंभीर जखमी झाल्या आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला सोमवार पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. डी. पवार हे करीत आहेत.

Back to top button