पुणे : मूलभूत अधिकार हेच भारतीय लोकशाहीचे सौंदर्य : न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांचे प्रतिपादन | पुढारी

पुणे : मूलभूत अधिकार हेच भारतीय लोकशाहीचे सौंदर्य : न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांचे प्रतिपादन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार हा आपल्या देशाच्या लोकशाहीचे सौंदर्य आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यही त्यातून मिळाले, त्यावर गदा येऊ नये यासाठी कायद्याची व्यवस्था आहे,’ असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांनी केले. भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त डॉ. पतंगराव कदम स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या हस्ते झाले.

‘लोकशाही आणि न्यायव्यवस्था’ या विषयावर त्यांनी विचार मांडले. या वेळी विद्यापीठाचे कार्यवाह आणि प्र-कुलगुरू डॉ विश्वजित कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी आणि विधी शाखेच्या अधिष्ठाता डॉ. उज्वला बेंडाळे आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. विवेक सावजी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शिवांगी सिन्हा व मुक्ता हेलिवाल यांनी केले.

गर्व करू नका…
ज्ञान मिळवा, प्रगती करा. मात्र, गर्व करू नका; कारण कोणत्याही गोष्टीला दुसरी बाजू असते, ती समजून घेता आली पाहिजे, असेही
न्या. माहेश्वरी यांनी सांगितले.

Back to top button