पुण्यात आणखी एक परदेशी प्रवासी पॉझिटिव्ह | पुढारी

पुण्यात आणखी एक परदेशी प्रवासी पॉझिटिव्ह

पुणे; पुढारी वृत्तसेवा : चीनसह इतर देशांमधील कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणा-या सर्व नागरिकांची विमानतळावर तपासणी केली जात आहे. या तपासणीत पुणे विमानतळावर एका महिलेनंतर आणखी एक नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे परदेशातून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता चार झाली आहे. एक जण नवी मुंबई तर एक रुग्ण गोवा येथील आहे.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, 24 डिसेंबरपासून मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत असून, 2 टक्के नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जात आहेत. आतापर्यंत 97 हजार 805 प्रवासी आले असून, 1926 प्रवाशांची आरटीपीसीआर करण्यात आली आहे.

कोरोनाबाधित चारही नमुने सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जात आहेत. पुण्यातील दुस-या रुग्णांची अधिक माहिती शुक्रवारी उशिरापर्यंत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून समजू शकली नाही.Corona update

 

Back to top button