बावडा : पांढर्‍या कांद्यास चांगला दर! | पुढारी

बावडा : पांढर्‍या कांद्यास चांगला दर!

बावडा; पुढारी वृत्तसेवा : सध्या खरीप हंगामातील कांद्याची काढणी, काटणी, वाळवणे, गोणीत पॅकिंग करणे, बाजारात पाठवणे आदी कामे कांदा उत्पादक शेतकर्‍यांकडून सुरू आहेत. बाजारामध्ये पांढर्‍या रंगाच्या कांद्यास चांगला दर मिळत असल्याचे बावडा येथील कांदा उत्पादक युवा शेतकरी संतोष शिवाजी जगताप यांनी सांगितले. संतोष जगताप यांनी तीन महिन्यांच्या पांढर्‍या कांद्याचे उत्पादन घेतले आहे. या कांद्याला सध्या सरासरी प्रतिकिलोस 40 रुपये दर मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या कांद्याची काटणी सुरू असून, वाळल्यानंतर कांदा गोणीत भरून सोलापूर मार्केटला नेणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

कांद्याचे बी शेतात लावून पीक उत्पादन घेतले आहे. ते शेतामध्ये प्रत्येक वर्षी कांद्याचे उत्पादन घेतात. त्यामुळे त्यांना या पिकातील बारकावे चांगलेच माहीत झाले आहेत. त्यांना वडील शिवाजी जगताप, आई, पत्नी यांची शेतीकामामध्ये मदत होत असते. बाजारामध्ये लाल कांद्याच्या तुलनेत पांढर्‍या कांद्याला त्यातील औषधी गुणधर्मामुळे अधिक मागणी असल्याचेही संतोष जगताप यांनी सांगितले.

Back to top button