पुणे : टाकीची भिंत कोसळून मजूर मृत्युमुखी | पुढारी

पुणे : टाकीची भिंत कोसळून मजूर मृत्युमुखी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : इमारतीच्या बांधकामावेळी मजुरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना न केल्यामुळे पाण्याच्या टाकीची भिंत कोसळून एका मजुराचा मृत्यू, तर दुसरा कामगार जखमी झाल्याची घटना बाणेर-पाषाण लिंक रोडवरील माउंट क्लेअर इमारत येथे 12 डिसेंबरला दुपारी घडली. रोहन रामचंद्र घाडे (सुखसागर नगर) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. आशिष बिंद हे यात जखमी झाले. याप्रकरणी रोशन घाडे (वय 20) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार रवींद्र चणबस डंडे (वय 39, रा. साई संकुलन, थेरगाव) आणि गोविंद राम सोनटक्के या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर-पाषाण लिंक रस्त्यावरील माउंट क्लेअर इमारत परिसरात बांधकाम सुरू आहे. रोहन आणि आशिष तळमजल्यावरील टाकीच्या भिंतीचे काम करीत होते. त्या वेळी भिंत कोसळली. रोहन गंभीर जखमी झाला. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. आशिषवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोहनच्या अंत्यविधीनंतर कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक कपिल भालेराव तपास करीत आहेत.

Back to top button