मांदळेवाडी परिसरात कांदा काढणी जोरात | पुढारी

मांदळेवाडी परिसरात कांदा काढणी जोरात

लोणी-धामणी (ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : मांदळेवाडी  येथे लागवड केलेली कांदा काढणी सध्या जोरात सुरू आहे. परिसरातील शेतकरी पाण्याचा अंदाज घेऊन पावसाळी कांदा लागवड करतात. चालू वर्षी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने विहिरी, नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने या परिसरात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली.

सध्या कांद्याला 10 किलोस 200 ते 250 रुपये बाजारभाव असत्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. कांद्याला असाच बाजारभाव राहिला, तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील, असे मांदळेवाडी येथील कांदा उत्पादक शेतकरी संभाजी आदक व हनुमंत आदक यांनी सांगितले.

Back to top button