पुणे : बस भंगार विक्रीतून पीएमपी मालामाल; अपसेट प्राईजपेक्षा 2 कोटी मिळाले जादा | पुढारी

पुणे : बस भंगार विक्रीतून पीएमपी मालामाल; अपसेट प्राईजपेक्षा 2 कोटी मिळाले जादा

प्रसाद जगताप

पुणे : पीएमपी प्रशासनाने यंदाही ताफ्यातील 244 भंगार झालेल्या बसगाड्या लिलावात काढल्या. त्या बसच्या स्क्रॅप विक्रीतून पीएमपीला 9 कोटी 11 लाख 8 हजार 844 रुपयांचा महसूल मिळाला आहे. पीएमपीने निश्चित केलेल्या अपसेट प्राईजपेक्षा 2 कोटींनी हा महसूल जास्तच असून, पीएमपीला 2 कोटींचा फायदा झाला.

पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या आदेशानुसार ताफ्यातील खराब झालेल्या, आयुर्मान संपलेल्या 244 गाड्या नुकत्याच स्क्रॅप करण्यात आल्या आहेत. दर वर्षी पीएमपीच्या भांडार विभागामार्फत स्क्रॅप गाड्यांची लिलाव प्रक्रिया पार पाडली जाते. या प्रक्रियेतून प्रशासनाला स्क्रॅपचा महसूल मिळतो.

सध्याची बस संख्या

स्व-मालकीच्या : 1012
भाडे तत्त्वावरील : 1130
एकूण गाड्या : 2 हजार 142

पीएमपीची अपसेट प्राईज : 6, 71, 14, 730 रुपये
लिलावात मिळालेला महसूल : 9, 11, 09, 844 रुपये
जादा मिळालेला महसूल : 2, 39, 95, 114 रुपये

कोणत्या मॉडेलच्या किती बस स्क्रॅप
अक्र बस मॉडेल स्क्रॅप बस संख्या
1) टाटा 4
2) लेलंड बस 157
3) सीएनजी बस 78
4) जीप 05
एकूण 244

कोणी किती केल्या बस खरेदी
मिथीलाल जैन : 161
साहू स्टील : 30
सिध्देश स्टील : 33
दीपक एंटरप्राईजेस : 20

कोणत्या डेपोच्या किती गाड्या स्क्रॅप
1) सुतारवाडी : 29
2) बालेवाडी : 49
3) शेवाळवाडी : 102
4) हडपसर : 37
5) अप्पर : 23
6) शिंदेवाडी : 04
एकूण
वाहने 244

Back to top button