पुरंदर-हवेलीवर आमदार, खासदारांचा अन्याय : शिवतारे | पुढारी

पुरंदर-हवेलीवर आमदार, खासदारांचा अन्याय : शिवतारे

सासवड, पुढारी वृत्तसेवा: पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी येथील जनतेवर विकासकामांच्या बाबतीत फार अन्याय केला असल्याचा आरोप बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे.
विकास प्रकल्प पुरंदर-हवेलीतून बाहेर ढकलण्यातच यांनी जास्त रस दाखविला तर जनतेच्या खर्‍या प्रश्नांकडे कानाडोळा केला असा आरोप करत शिवतारे यांनी त्यांना काही प्रश्न विचारले आहेत.ते म्हणताता आ.संजय जगताप आणि खासदार सुप्रिया सुळे यांना या प्रश्नांची उत्तरे पुरंदर-हवेलीच्या जनतेला उत्तरं द्यावी लागतील

पुरंदरचा प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ बारामतीला का पळवली होता याचे उत्तर प्रथम द्यावे,हा पुरंदरच्या विकासाचा गेमचेजंर प्रकल्प आहे, हे माहीत असताना तो बारामतीकडे नेण्याचा प्रयत्न झाला,पुरंदरच्या जनतेच्या सुदैवाने सत्ताबदल झाल्याने हा बेत आता बारगळला आहे, नाहीतर हा प्रकल्प बारामतीत गेल्यात जमा होता असे सांगून शिवतारे म्हणाले,जलजीवन योजना केंद्र आणि राज्याची, कॉग्रेस आणि राष्ट्रवादी का्ॅग्रेस हे आमदार,खासदारांचे पक्ष दोन्हीही ठिकाणी सत्तेत नाहीत. मग त्यांचे या कामात योगदान काय ? त्यांचे सरकार असताना निधी देत नव्हता, मग सत्तेतून बाहेर फेकल्यावर यांची कार्यक्षमता वाढली काय ?काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार येताच पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत गुंजवणीच पाणी बारामतीला पळविल्याचा निर्णय या दोघांच्या पक्षांनी घेतला नंतर गुंजवणी जलवाहिनीच्या कामाचा खोळंबा का झाला ? फुरसुंगी उरुळी पाणी योजनेसाठी 24 कोटी दिले नाहीत, मग बारामतीच्या एसटी स्टँडला 200 कोटी कसे दिलेत ? आपण सरकारमध्ये येताच विजेचा दर तिप्पट वाढवून शेतकर्‍यांचे 19 टक्के दराने मिळणारे पुरंदर उपसा व जनाईचे पाणी बंद का केले होते ? दिवे येथील राष्ट्रीय बाजार रद्द करून थेऊरच्या यशवंत कारखान्याच्या जागेत का पळवला होता ? याप्रश्नाची उत्तरे आ.संजय जगताप यांना द्यावी.

Back to top button