बारामतीत आज पवारांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम | पुढारी

बारामतीत आज पवारांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम

बारामती; पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त बारामतीत विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पक्षाचे शहराध्यक्ष जय पाटील यांनी दिली. पुढील दोन महिने शहर व परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार असल्याचे पाटील व पक्षाच्या महिलाध्यक्षा अनिता गायकवाड यांनी सांगितले.

सोमवारी (दि. 12) शहरातील मोरयानगर येथे मयूरेश्वर, उघडा मारुती मंदिर, काशिविश्वेश्वर, महादेव, श्रीमंत आबा गणपती, दत्तात्रय, स्वामी समर्थ मंदिर येथे अभिषेक, चांदशाहवली दर्ग्यास चादर अर्पण करणे, त्यानंतर महिलांची मोफत थायरॉईड व हिमोग्लोबीन तपासणी, व्हर्च्युअल रॅली, रुग्णांना फळवाटप, अखंड पाठ समाप्ती, फ्री मेडिकल चेकअप व औषधोपचार, शाळेला संगणक भेट, वृक्षारोपण, महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

याशिवाय या आठवड्यात अवजड वाहनांना रिफ्लेक्टर बसविणे, ऊसतोडणी मजुरांना ब्लँकेट, शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाद्वारे कर्ज योजनेचा लाभ देणे, राज्यस्तरीय युवा डान्स स्पर्धा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान शिबिरे, निकाली कुस्त्या, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अन्नदान असे अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

Back to top button