दै. पुढारी आयोजित ‘राईज अप’ महिला क्रीडा स्पर्धा : जलतरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद | पुढारी

दै. पुढारी आयोजित ‘राईज अप’ महिला क्रीडा स्पर्धा : जलतरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे; पुढारी वृत्तसेवा ; दै. पुढारी आयोजित राईज अप महिलांच्या जलतरण स्पर्धेला महिला खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या स्पर्धेला शनिवारी दि. 10 डिसेंबरपासून डेक्कन येथील टिळक तलावावर सुरुवात होणार आहे. या स्पर्धेमध्ये महिलांनी आपला सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या स्पर्धा शनिवार दि. 10 आणि रविवार दि. 11 डिसेंबर या कालावधीत सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत डेक्कन येथील टिळक तलाव येथे होणार आहेत.

या स्पर्धेमध्ये 7 वर्षांखालील, 9 वर्षांखालील, 11 वर्षांखालील, 13 वर्षांखालील, 15 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील अशा गटांमध्ये होणार आहेत. या स्पर्धेत 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक, बॅक स्ट्रोक, बटरफ्लाय, फ्री स्टाईल, 100 मीटर फ्री स्टाईल, बॅक स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक, बटरफ्लाय, 200 मीटर फ्री स्टाईल, 200 आयएम या प्रकारांमध्ये खेळाडू आपले कौशल्य अजमावणार आहेत.

या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता युनिक सिस्टिम स्किल्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ संतोष साळवी यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक ऑक्सिरीच, हेल्थ पार्टनर डॉ. ऑर्थो, अ‍ॅकॅडमिक पार्टनर सूर्यदत्ता एज्युकेशन इन्स्टिट्यूट, फायनान्शिअल पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी, मीडिया पार्टनर झी टॉकीज या सर्व प्रायोजकांच्या सहकार्याने पार पडणार आहे.

Back to top button