पुणे : नवले पुलाच्या अपघातांचं ग्रहण सुटेना ! अपघातात चार जखमी | पुढारी

पुणे : नवले पुलाच्या अपघातांचं ग्रहण सुटेना ! अपघातात चार जखमी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  बंगळुरू महामार्गावरील नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून आज बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एका पिकअप वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून महामार्गावर पलटी झाले. यामध्ये एकूण ८ प्रवासी होते. यातील चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात नऱ्हे -नवले पुलाजवळ असणाऱ्या भूमकर पुलाजवळ घडला. याबाबत घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस तसेच हायवे पेट्रोलिंगचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचून अपघातग्रस्त वाहन क्रेन च्या साहाय्याने बाजूला केले.

तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पिक अप वाहनचालकाच्या म्हणण्यानुसार, वाहनाला पाठीमागून ट्रकने धडक दिल्याने वाहन पलटी झाले. गेल्या आठवड्यात सात दिवसांत आठ अपघात या परिसरात झाले आहेत. वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात नागरिक संतप्त झालेले पहावयाला मिळत आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होते आहे.

Back to top button