कानपूरहून पुण्यात आणून मावसकाकाचे दुष्कृत्य; नात्याला काळिमा फासणारी घटना | पुढारी

कानपूरहून पुण्यात आणून मावसकाकाचे दुष्कृत्य; नात्याला काळिमा फासणारी घटना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : फसवणुकीच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात आई, वडील शिक्षा भोगत होते. त्यांना भेटण्यासाठी कानपूर येथून पुण्यात आलेल्या 14 वर्षीय निर्भयाच्या असाह्यतेचा फायदा घेत मावसकाकाने दुष्कृत्य केले. आई-वडिलांना जामीन होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मूळची कानपूर येथील आहे. तिचे आई-वडील फसवणुकीच्या गुन्ह्यात 30 डिसेंबर 2021 पासून येरवडा कारागृहात आहेत.

त्यांनाच भेटण्यासाठी ही मुलगी मावसकाका असलेल्या रोहित गौर याच्याबरोबर कानपूर येथून पुण्यात आली होती. दोघेही कानपूरहून पुणे येथील ताडीवाला रस्त्यावरील लॉजवर थांबले होते. या वेळी आरोपी हा लॅपटॉपवर काम करत असताना त्याने लॅपटॉप बंद केला. तसेच तो लॅपटॉप ठेवण्यासाठी पीडिताला बोलवले. पीडिता त्याच्याजवळ गेली असता त्याने तिचा हात पकडला.

या वेळी तिने त्याला विरोध करत काका हे काय करता? असे म्हणाली असता त्याने तिला मी जे करत आहे ते करू दे. नाही तर, मी तुझ्या आई-वडिलांना कारागृहातून जामीन होऊन देणार नाही. त्यांना कारागृहातच सडवेल, अशी धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. हा सर्व प्रकार 6 जुलै 2022 ला ताडीवाला येथील लॉजवर घडला. या गुन्ह्याला अखेर चार महिन्यांनी वाचा फुटली. बंडगार्डन पोलिसांनी घटनेचे गांभिर्य पाहता गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक ए. एम. जाधव करीत आहेत.

पोलिस ठाण्यात धाव
जेव्हा तिला तिची आई कारागृहातून जामिनावर बाहेर आली असे समजले, तेव्हा ती पुन्हा पुण्यात आली. तिने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. दोघींनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. त्या आधारे संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

Back to top button