पुणे : ‘पीडब्ल्यूडी’ची कामे देण्याच्या बहाण्याने 25 लाखांची फसवणूक | पुढारी

पुणे : ‘पीडब्ल्यूडी’ची कामे देण्याच्या बहाण्याने 25 लाखांची फसवणूक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक बांधकाम विभागाची (पीडब्ल्यूडी) कामे मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाची 25 लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात सचिन साळुंके (रा. आंबेगाव, कात्रज) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समीर शशिकांत रहाटे (वय 46, रा. मुलुंड) यांनी फिर्याद दिली. समीर यांची एस. आर. ग्लोबल एंटरप्रायझेस नावाने कंपनी आहे. त्यांनी या कंपनीच्याच नावाने पीडब्ल्यूडीचे काम करण्याचे लायसन्स काढले आहे.

लायसन्स काढल्यानंतर कामे मिळविण्यासाठी पीडब्ल्यूडीकडून त्यांना डिजिटल की (पेनड्राइव्ह) दिली होती. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता तेथे त्यांची सचिन साळुंकेशी ओळख झाली. त्या वेळी त्याने समीर यांना सांगितले की, तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा भरण्यामध्ये पारंगत असून, अनेक उच्चपदस्थ अधिकार्‍यांशी ओळखी आहेत. यानंतर त्याने पीडब्ल्यूडीने दिलेली डिजिटल की मागून घेतली. यानंतर विश्वास संपादन करून कामे मिळवून देण्याच्या बहाण्याने चार वर्षांत 25 लाख रुपये लाटले.

Back to top button