भोर : कंपन्यांचे भोरमध्ये स्वागत : आ. संग्राम थोपटे | पुढारी

भोर : कंपन्यांचे भोरमध्ये स्वागत : आ. संग्राम थोपटे

भोर; पुढारी वृत्तसेवा : भोर तालुक्याच्या दुर्गम-डोंगरी भागातील तरुणांना रोजगा3र मिळावा, यासाठी कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी यांना घेऊन रोजगार मेळावे घ्यावे लागतात. परंतु कंपन्यांनी भोरमध्ये रोजगार उभारावा, त्याचे आम्ही स्वागत करू, असे मत आ. संग्राम थोपटे यांनी व्यक्त केले. भोर येथे आ. संग्राम थोपटे गौरव समितीच्या वतीने अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या मैदानावर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आ. थोपटे बोलत होते.

यावेळी राजगड ज्ञानपीठाच्या मानद सचिव स्वरूपा थोपटे, बाळासो थोपटे, सुधीर खोपडे, गजानन कुलकर्णी, किरण रहाणे, गीतांजली शेटे, दीपक पवार, सदरुल्ला, मिनल अनिल सावले, आनंद आंबवले, पृथ्वीराज थोपटे, विश्वनाथ रोमण, सचिन हर्णसकर, सुमंत शेटे, विजय शिरवले, प्राचार्य पी. जी. देशमुख, अभिषेक येलगुडे, चंद्रकांत मळेकर, सुशिक्षित तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मेळाव्यात झी लॉन प्रा.लि. युवा हब, हुंदाई टेक्नॉलॉजी अशा 109 कंपन्या रोजगार मेळाव्यासाठी आपले स्टॉल लावून सहभागी झाले होते. 2 हजार 567 तरुणांच्या मुलाखती घेऊन यावेळी 960 तरुणांना विविध कंपन्यांनी नोकरीची नियुक्तीपत्रे देण्यात आली. 470 तरुणांचे प्रशिक्षण होऊन त्यांनाही नोकरी देण्यात येणार असून 1 हजार 117 जणांना 15 दिवसांचे प्रशिक्षण घेतले जाणार आहे. ज्या तरुणांना नोकरी मिळाली अशा तरुणांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता, असे राहुल खामकर, प्रा. विनय कुलकर्णी, काकासाहेब कोरे यांनी सांगितले.

Back to top button