पुणे : टाळ-मृदंगाच्या तालावर पालकमंत्र्यांनी घातली फुगडी, कर्वेनगरमध्ये काकडा आरतीस उपस्थित | पुढारी

पुणे : टाळ-मृदंगाच्या तालावर पालकमंत्र्यांनी घातली फुगडी, कर्वेनगरमध्ये काकडा आरतीस उपस्थित

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्वेनगर येथील विठ्ठल मंदिरात आयोजित काकड आरतीस उपस्थिती लावली. या वेळी टाळ-मृदंगाच्या तालावर आणि विठ्ठलाच्या नामघोषात तल्लीन झाले.

परंपरेनुसार प्रतिवर्षी कार्तिक शुद्ध एकादशीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत अनेक मंदिरांमध्ये काकड आरती सुरू असते. पालकमंत्री पाटील यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघातील कर्वेनगर भागातील विठ्ठल मंदिरात काकड आरतीस उपस्थिती लावली. या वेळी सर्व वारकरी बांधव हरी भजनात तल्लीन झाले होते. मंत्री पाटील यांनी विठ्ठलाचे दर्शन घेऊन पूजा केली. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या तालावर विठुनामाच्या गजरात तल्लीन झाले. या वेळी त्यांनी वारकरीबांधवांसोबत परंपरेचा भाग म्हणून फुगडीही घातली.

Back to top button