‘खडकवासला’त कोसळलेल्या महिलेचा अद्यापही शोध लागेना | पुढारी

‘खडकवासला’त कोसळलेल्या महिलेचा अद्यापही शोध लागेना

खडकवासला : पुणे-पानशेत रस्त्यावर कुरण गावाजवळ दुचाकीवरून खडकवासला धरणात कोसळल्याचा संशय असलेल्या महिलेचा अद्यापही शोध लागला नाही. गेल्या तीन दिवसांपासून या महिलेचा धरणात शोध घेण्यात येत आहे. अलका विनायक राऊत (वय 34, मूळ रा.घिसर, ता. वेल्हे, सध्या रा. वडगाव बुद्रुक), असे या महिलेचे नाव आहे. शुक्रवारी (दि. 4) धरणाच्या तीरावर अलका यांची दुचाकी अडकलेल्या अवस्थेत आढळून आली. तेव्हापासून त्या बेपत्ता आहेत.

याप्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात बेपत्ताची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांच्या देखरेखीखाली पोलिसांनी मच्छीमार, तसेच पीएमआरडीच्या अग्निशमन दलाचे जवान या महिलेचा धरणात शोध घेत आहेत. मात्र, अद्यापही त्यांचा शोध लागला नसल्याचे तपासी अंमलदार औदुंबर आडवाल यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी नातेवाइकांकडे सखोल चौकशी सुरू केली आहे.

पानशेत रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ठिकाणी संरक्षक कठडे उभारण्याचे काम सुरू केले आहे. पानशेत-कादवे रस्त्यावरही धोक्याच्या ठिकाणी संरक्षक कठडे उभे केले जाणार आहेत.
                                                                         -अजय भोसले,
                                              कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Back to top button