खोर : महामार्गावर ऊस वाहतूक ट्रॅक्टर रिफ्लेक्टरविना | पुढारी

खोर : महामार्गावर ऊस वाहतूक ट्रॅक्टर रिफ्लेक्टरविना

खोर; पुढारी वृत्तसेवा: सध्या दौंड तालुक्यातील साखर कारखाने सुरू झाल्याने ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरची गजबज महामार्गांवर सुरू झाली आहे. मात्र, ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरच्या पाठीमागे ट्रॉलीला दिशादर्शक परिवर्तक रिफ्लेक्टर बसविण्यात न आल्याने ऊस वाहतूक करताना पुणे-सोलापूर महामार्ग सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे.

यवत येथील अनुराज शुगर कारखाना, दौंड शुगर कारखाना, भीमा-पाटस कारखाना, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना हे दौंड तालुक्यात आहेत. हे कारखाने सुरू झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरची रहदारी वाढली आहे. मात्र, पाठीमागच्या बाजूला ट्रॉलीला दिशादर्शक परिवर्तक असणारे रिफ्लेक्टर अजूनही कारखान्यांनी बसविले नाही. त्यामुळे याचा परिणाम अपघातात होऊन रस्त्यावर मोठा भीषण अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

Back to top button