‘पिकअवर्स’मध्ये जड वाहतूक बंद ; 36 रस्ते घेणार मोकळा श्वास | पुढारी

‘पिकअवर्स’मध्ये जड वाहतूक बंद ; 36 रस्ते घेणार मोकळा श्वास

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मध्यवस्तीसह उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, ती सोडविण्यासाठी प्रमुख रस्त्यावर जडवाहतुकीला ठराविक वेळेत बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी जारी केला आहे.  वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहरातील तब्बल 36 रस्त्यांवर सकाळी आणि संध्याकाळी जड वाहतुकीला बंदी घालण्यात आली. त्यात शिवाजी रस्ता, गणेश रोड, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, लालबहादूर शास्त्री रोड, केळकर, कुमठेकर, शनिपार-मंडई, घोरपडे पथ, बाजीराव रस्त्यावर सायंकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत जड वाहतुकीला बंदी घालण्यात आली.

3लक्ष्मीनारायण-मित्रमंडळ चौक, सिंहगड रस्ता (सावरकर चौक ते वडगाव पूल) या मार्गावर सकाळी सहा ते दुपारी 12 वाजेपर्यंत तसेच दुपारी दोन ते रात्री 10 वाजेपर्यंत, पंडित जवाहरलाल नेहरू रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, महात्मा गांधी रस्ता, सोलापूर रोड, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज, लॉ कॉलेज, सेनापती बापट रस्ता, गणेशखिंड, बंडगार्डन, साधू वासवानी रस्त्यावर सायंकाळी सहा ते रात्री 11 वाजेपर्यंत जडवाहतूक बंद असणार आहे.

सातारा रस्ता, बिबवेवाडी-कोंढवा, गंगाधाम शत्रुंजय, शिवरकर रोड या मार्गावर सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत आणि सायंकाळी सहा ते रात्री 10 वाजेपर्यंत जडवाहतुकीस बंदी असणार आहे. त्याबरोबरच नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क रस्त्यावरील वाहतूक सायंकाळी सहा ते रात्री 11 वाजेपर्यंत जडवाहतूक बंद असेल, असे श्रीरामे यांनी आदेशात नमूद केले आहे.

Back to top button