माळेगाव: पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचविले | पुढारी

माळेगाव: पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचविले

माळेगाव, पुढारी वृत्तसेवा: कऱ्हा नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने वाचवण्यात यश आले असून सदर घटना बारामती मोरगाव रस्त्यांवरील कऱ्हा- वागज येथे घडली. दरम्यान धोकादायक ठिकाणी माळेगांव पोलिस ठाण्याअंतर्गत सर्तक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

सोमवारी (दि. १७) रात्री झालेल्या तुफान पावसामुळे कऱ्हा नदीला पुर आला आहे. या पुराचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने कऱ्हा वागज- जळगाव आणि बारामती – मोरगाव या रस्त्यांवरील वाहतूक पुर्ण ठप्प झाली आहे. याच पाण्यात खासगी कामानिमित्त बारामती येथे आलेले सुनील विश्वास चव्हाण (रा. साकुर्डे, ता. पुंरदर) हे पॅशन गाडीसह (एमएच १२ एलएल ५१४९) हे पुराच्या पाण्यात वाहून चालले होते. यावेळी माळेगावचे पोलीस निरीक्षक किरण अवचर, सहायक पोलिस निरीक्षक देविदास साळवे, तुषार भोर, पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप, प्रविण वायसे, पोलीस कॉन्स्टेबल अमजद शेख, ज्ञानेश्वर मोरे,सागर शिंदे, जयसिंग कचरे, होमगार्ड रोहित भोसले, रमजान डांगे, नितीन जंगम, सौरव थोपटे, निलेश बनसोडे यांच्यासह क-हावागजचे सरपंच सचिन नाळे, उपसरपंच संतोष गावडे,सचीन लष्कर, ॲड.मच्छिंद्र मुलमुले यांनी मदत केली.

Back to top button