पिंपरी : आजपासून रंगणार ‘पुढारी’ शॉपिंग अ‍ॅण्ड फूड फेस्टिव्हल | पुढारी

पिंपरी : आजपासून रंगणार ‘पुढारी’ शॉपिंग अ‍ॅण्ड फूड फेस्टिव्हल

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना गुरुवार (दि.13) पासून पुढील पाच दिवस अस्सल कोल्हापुरी झणझणीत व लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घेण्याची व शॉपिंगची संधी एकाच छताखाली उपलब्ध करण्यात आली आहे. दैनिक ‘पुढारी’ आयोजित व चकोते ग्रुप प्रस्तुत शॉपिंग अ‍ॅण्ड फूड फेस्टिव्हलचे आयोजन 13 ते 17 ऑक्टोबरदरम्यान चिंचवड येथील शाहूनगर याठिकाणी करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी हे सहप्रायोजक व स्मिता हॉलिडेज हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत.

या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार (दि. 13) सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, चकोते ग्रुपचे अण्णासाहेब चकोते, लोकमान्य मल्टिपर्पजचे सुशील जाधव व स्मिता हॉलिडेजचे जयंत गोरे उपस्थित राहणार आहेत. पाच दिवस रंगणारा हा फेस्टिव्हल खरेदीसाठी आणि खाद्यप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे.

राजर्षी शाहूमहाराज ग्राउंंड (बहिरवाडे ग्राउंंड) याठिकाणी सकाळी दहा ते रात्री नऊपर्यंत नागरिकांना अस्सल कोल्हापुरी झणझणीत व लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घेण्याची व शॉपिंगची संधी उपलब्ध करण्यात आली आहे.दिवाळीची सर्व खरेदी कोल्हापुरी तांबडा – पांढरा, कोल्हापुरी मिसळ, चिकन 65, फिश, खरडा भाकरी, वांग भाकरी, साऊथ इंडियन, पंजाबी, चायनीज, चौपाटी पदार्थ, पिझ्झा, बर्गर, असे विविध प्रकारचे खाद्य पदार्थार्ंंचे स्टॉल्स या फेस्टिव्हलमध्ये आहेत.

तसेच प्रदर्शनामध्ये इलेक्ट्रिक उत्पादने, ऑटोमोबाईल, फर्निचर, गृहोपयोगी वस्तू, कपडे, ज्वेलरी तसेच खवय्यांसाठी मसाले, चटणी, लोणची. त्याचबरोबर सौंदर्यप्रसाधने, हॅण्डलूम हँडिक्राफ्ट, आयुर्वेदिक उत्पादने असेदेखील स्टॉल्स
उपलब्ध आहेत.

Back to top button