चौफुलातील बेशिस्त पार्किंग प्रवाशांची डोकेदुखी | पुढारी

चौफुलातील बेशिस्त पार्किंग प्रवाशांची डोकेदुखी

खोर : चौफुला चौकातील बेशिस्त पार्किंग प्रवाशांची डोकेदुखी ठरत आहे. बेशिस्त पार्किंगवर वेळीच बंधन आणणे गरजेचे आहे. अवैध वाहतूक करणार्‍या जीपगाड्या भरचौकात थांबवून प्रवासी भरत असतात. बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली जात आहे. चौफुला चौकामधून शिरूर – सुपा हा राज्य महामार्ग जातो. ह्या ठिकाणी नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते.

चौकात अवैध वाहतूक करणार्‍या जीपगाड्या कशाही प्रकारे भररस्त्यामध्ये उभ्या असतात. चाकण, रांजणगाव एमआयडीसीकडे जाणारे मोठया कंटेनर, अवजड वाहतूक करणारी चारचाकी वाहनांची संख्या मोठी असते. चुकून एखाद्या व्यक्तीचा या अवजड वाहतूक करणार्‍या गाडीचा धक्का लागला तर मोठ्या अपघाताची शक्यता आहे. वेळीच बेशिस्त पार्किंगवर बंधन आणणे गरजेचे आहे.

Back to top button