पुण्यासह अनेक जिल्ह्यांत तीन दिवस मुसळधार | पुढारी

पुण्यासह अनेक जिल्ह्यांत तीन दिवस मुसळधार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: परतीचा मान्सून पाच दिवस उशिरा महाराष्ट्राच्या सीमेवर येऊन दाखल झाला आहे. त्यामुळे आगामी तीन दिवस राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. कोल्हापूरसह राज्याच्या अनेक जिल्ह्यांत हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. परतीचा मान्सून यंदा 26 सप्टेंबर रोजीच राजस्थानातून निघाला, तो महाराष्ट्रापर्यंत 5 ऑक्टोबरपर्यंत येणार होता. तो राजस्थानातच रेंगाळला. आता पुढे सरकत मध्य प्रदेशातून रविवारी गुजरात ओलांडून महाराष्ट्राच्या सीमेवर आला आहे. त्यामुळे राज्यात आगामी तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात 8 दिवस मुक्कामाची शक्यता
मान्सून उत्तर काशी, निझामाबाद, आग्रा, ग्वाल्हेर, रतलाम, भरुच असा प्रवास करीत महाराष्ट्राच्या सीमेवर आला आहे. 10 ते 18 ऑक्टोबर दरम्यान तो महाराष्ट्रातून प्रवास करेल, असा अंदाज आहे.

या भागात यलो अलर्ट.. (10 ते 12 ऑक्टोबर)
कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद

Back to top button