पुणे-नगर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत तरुण दुचाकीस्वाराचा मृत्यू | पुढारी

पुणे-नगर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत तरुण दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे : पुणे- नगर रस्त्यावर ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघात घडल्यानंतर पसार झालेल्या ट्रकचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याकुब खलील अन्सारी (वय ३८, रा. भावडी रोड, वाघोली) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुण दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत याकुबचे काका निजामुद्दीन अन्सारी यांनी याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याकुब अन्सारी हे पुणे- नगर रस्त्यावरुन सकाळी दहाच्या सुमारास निघाले होते. त्यांना वाघोली परिसरात एका भरधाव ट्रकने धडक दिली. ते अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पसार झालेल्या ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कर्मचारी तिकोणे अधिक तपास करत आहेत.

Back to top button