पुणे : रूग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण, अपर्णा साठे यांच्यावर खंडणीचा गुन्हा | पुढारी

पुणे : रूग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण, अपर्णा साठे यांच्यावर खंडणीचा गुन्हा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मालमत्तेवर महानगरपालिकेमार्फत कारवाई न करण्यासाठी 60 लाखांची मागणी करून अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणात रूग्ण हक्क परिषदेचा अध्यक्ष उमेश भगावानराव चव्हाण (35, रा. धानोरी )आणि अध्यक्षा अपर्णा साठे (38, रा. नारायण पेठ) यांच्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बांधकाम व्यावसायीक मोहसीन नबी खान (38, रा. साईबाबानगर, कोंढवा, पुणे) यांनी अ‍ॅड. साजिद शाह यांच्या मार्फत न्यायालयात धाव घेतली होती.

दाखल गुन्ह्यानुसार, उमेश चव्हाण आणि अपर्णा साठे हे रूग्ण हक्क परिषदेचे पदाधिकारी आहेत. त्यांनी फिर्यादीचे हॉस्पीटल विकत घेतले. त्यानंतर चव्हाण व त्याच्या सहकार्‍यांना हॉस्पीटलची परवानगी नसताना वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांना बोलवुन हॉस्पीटलचे उदघाटन केले. तसेच आरण्चपी नावाने हॉस्पीटल सुरू करून हॉस्पीटलच्या नावाने वेगवेगळ्या योजना तयार केल्या. तसेच शासकीय योजनांच्या नावावर लोकांकडून पैसे उकळून हॉस्पीटलमधील मेडिकल स्टोअर, लॅब, उपहारगृह चालविण्याच्या बदल्यात लाखो रूपयांची अनामत रक्कम घेतली.

तसेच महारजत बँक नावान हॉस्पीटलमध्येच बँक सुरू करून छोट्या मोठ्या व्यावसायीकांडून पैसे घेऊन खान यांनी हॉस्पीटलच्या व्यवहाराविषयी विचारल्यानंतर चव्हाण व त्यांच्या सहकार्‍यांनी हॉटेलच्या नावावर केलेल्या 50 ते 60 लाखाच्या गैरव्यवहाराचे पैसे खान यांनीच द्यावे असा पवित्रा घेतला. तसेच खान यांना वारंवार ब्लॅकमेल करून त्यांच्या मालमत्तेवर महानगर पालिकेमार्फत कारवाई न करण्याकरिता 60 लाखांची मागणी केली.

तसेच अ‍ॅट्रॉसिटीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्याद नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, गुन्ह्या दाखल होण्यापूर्वी न्यायालयात अ‍ॅड. साजिद शाह यांनी बाजु मांडून याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता चव्हाण आणि साठे यांच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button