पुणे : मुद्रांक आणि नोंदणीतील सुविधा अद्ययावत करा | पुढारी

पुणे : मुद्रांक आणि नोंदणीतील सुविधा अद्ययावत करा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्याला सर्वांत मोठा महसूल देणार्‍या मुद्रांक आणि नोंदणी विभागातील सुविधांचे अद्ययावतीकरण लवकरात लवकर करा, अशा सूचना राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. शनिवारी त्यांनी नोंदणी व मुद्रांकविषयक कामकाजाचा आढावा घेतला, त्या वेळी या सूचना दिल्या.

नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर, सह नोंदणी महानिरीक्षक ज्ञानेश्वर खिलारी, नोंदणी उपमहानिरीक्षक गोविंद कराड, सुहास मापारी आदी उपस्थित होते. या वेळी हर्डीकर यांनी कामकाजाबाबत माहिती दिली.

रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट 1908 मधील सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव, मुंबई मुद्रांक अधिनियमांमध्ये सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव, नोंदणी विभागांतर्गत माहिती व तंत्रज्ञानामार्फत सुरू असलेल्या नवीन उपक्रमाची सादरीकरणाव्दारे माहिती देण्यात आली.

Back to top button