मोठी बातमी | नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलली | Maharashtra MLC Election | पुढारी

मोठी बातमी | नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलली | Maharashtra MLC Election

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शिक्षक संघटनांच्या रेट्यापुढे केंद्रीय निवडणूक आयोगाने माघार घेत राज्यातील नाशिक व मुंबई शिक्षक तसेच मुंबई व कोकण पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम स्थगित केला आहे. आयोगाने मंगळवारी (दि. १४) यासंदर्भात पत्र काढले. शालेय सुट्यांनंतर नव्याने निवडणूकांचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता असल्याने हजारो शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. (Maharashtra MLC Election)

निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात नाशिकसह राज्यातील दोन शिक्षक तसेच दोन पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला. बुधवारपासून (दि.१५) या चारही मतदारसंघामध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करायची प्रक्रीयेस प्रारंभ होणार होता. १० जूनला मतदान व १३ तारखेला मतमोजणी पार पडणार होती. परंतु, सध्याची लोकसभा निवडणूकांची धामधूम तसेच शाळांना सुरु असलेल्या उन्हाळी सुट्यांचा परिणाम शिक्षक निवडणूकीवर होण्याची भिती होती. तसेच सलगच्या निवडणूकांमुळे शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडणार हाेता. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाच्य निवडणूका पुढे ढकलण्याची मागणी होत होती. राज्यातील शिक्षक संघटनांनी या संदर्भात थेट केंद्रीय निवडणूक आयोगालाकडेच पत्र व्यवहार केला.  (Maharashtra MLC Election)

शिक्षक संघटनांच्या पत्राची दखल (Maharashtra MLC Election)

शिक्षक संघटनांच्या पत्राची दखल घेत निवडणूक आयोगाने निवडणूका स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत आयोगाने मंगळवारी (दि.१४) पत्रच प्रसिद्ध करताना आदर्श आचारसंहितादेखील स्थगित केल्याचे पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, राज्यातील माध्यमिक शाळांचे नुतन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरु होत आहे. त्यामूळे शिक्षक संघटनांची एकुणच मागणी व शालेय सुट्यांचा विचार करता आयोगाकडून १५ जूननंतरच निवडणूकीचा कार्यक्रम  घेऊ शकते.

हेही वाचा –

Back to top button