केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्या स्वागतासाठी शेळगावनगरी सज्ज | पुढारी

केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्या स्वागतासाठी शेळगावनगरी सज्ज

शेळगाव; पुढारी वृत्तसेवा: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन शुक्रवारी (दि. 23) शेळगाव (ता. इंदापूर) येथे दौर्‍यावर येत असून, त्यांच्या स्वागतासाठी शेळगावनगरी सज्ज झाली आहे. येथील कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती शेळगाव येथील भाजप पदाधिकारी मोहन दुधाळ, आबासाहेब शिंगाडे व राहुल जाधव यांनी दिली.

केंद्रीय अर्थमंत्री शेळगावला आल्यानंतर त्या श्री संत मुक्ताबाई मंदिरात दर्शन घेऊन आरती करणार आहेत. त्यानंतर त्या संत मुक्ताबाई मंदिराच्या पाटांगणात शेतकरी व युवकांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या दौर्‍याच्या नियोजनाकरिता मागील 5 ते 6 दिवस भाजपचे प्रमुख पदाधिकारी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांची शेळगावनगरीत रेलचेल सुरू आहे.

शेळगाव येथे येण्यासाठी शेळगाव बसस्थानक ते शेळगावसह चारही बाजूच्या रस्त्याची डागडुजी व स्वच्छता करण्याचे काम भिगवण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आहेत. प्रशासनातील सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी व शेळगाव भाजपचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. या वेळी कार्यक्रमस्थळी भाजपचे मोहन दुधाळ, आबासाहेब शिंगाडे, राहुल जाधव, माऊली चवरे, हनुमंत शिंगाडे, संतोष भांगे आदींसह इतर उपस्थित होते.

 

 

Back to top button