शिरूर: गस्तीवरील पोलिसांच्या सतर्कतेने रस्ता खुला | पुढारी

शिरूर: गस्तीवरील पोलिसांच्या सतर्कतेने रस्ता खुला

टाकळी हाजी, पुढारी वृत्तसेवा: टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे शिरूर- नारायणगाव रस्त्यावर आशीर्वाद क्लिनिकसमोर सोमवारी (दि. 12) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास झाड कोसळल्याने रस्ता बंद झाला होता. पोलिस नाईक धनंजय थेऊरकर आणि संतोष पानगे यांनी जेसीबीच्या साहाय्याने रात्रीच ते झाड बाजूला हटवून रस्ता खुला केला.

रात्रीच्या वेळी वर्दळीच्या ठिकाणी झाड पडले होते तिथे उतारावरून वाहने वेगाने येत होती, त्यामुळे अपघाताची शक्यता होती. दुचाकीवरून जाणारा एक युवक त्या ठिकाणी थोडक्यात बचावल्याचे टाकळी हाजीतील उद्योजक संतोष पानगे यांनी पाहिल्यानंतर ताबडतोब पोलिसांना कल्पना दिली. गस्तीवर असलेले पोलिस नाईक धनंजय थेऊरकर हे सतर्कता दाखवत त्या ठिकाणी दाखल झाले. स्वतः त्या ठिकाणी जेसीबी घेऊन आले आणि रात्री साडेबारा वाजता त्यांनी रस्ता मोकळा केला. रस्ता खुला करून दिल्याबद्दल टाकळी हाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे यांनी त्यांचे कौतुक केले.

Back to top button