पुणे : झेंडूच्या दरात निम्म्याने घसरण | पुढारी

पुणे : झेंडूच्या दरात निम्म्याने घसरण

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावल्याने त्याचा सर्वाधिक फटका झेंडू व शेवंतीच्या फुलांना बसला आहे. बाजारात दर्जेदार फुलांपेक्षा ओल्या फुलांचे प्रमाण जास्त आहे. परिणामी, आठवडाभरात झेंडूचे दर निम्म्यावर आले आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लागवडीत वाढ झाल्याने मार्केट यार्डातील फुलबाजारात झेंडूची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

मात्र, पावसामुळे बाजारात ओल्या मालाचे प्रमाण जास्त आहे. याखेरीज, मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने झेंडूच्या दरात निम्म्याने घसरण झाली आहे. उर्वरित अन्य सर्व फुलांची आवक साधारण असून गत आठवड्याच्या तुलनेत भाव स्थिर आहेत.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : 10-30, गुलछडी : 150-300, अ‍ॅष्टर : जुडी 10-20, सुट्टा 150-200, बिजली : 80-150, कापरी : 20-40, शेवंती : 80-150, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : 20-50, गुलछडी काडी : 30-80, डच गुलाब (20 नग) : 60-150, जर्बेरा : 40-70, कार्नेशियन : 150-200, शेवंती काडी 150-200, लिलियम (10 काड्या) 1200-1300, ऑर्चिड 400-600, ग्लॅडिओ (10 काड्या) : 70-100.

Back to top button