पुणे : एसटी बस गावाबाहेरून धावल्याने बेल्हेत समस्या | पुढारी

पुणे : एसटी बस गावाबाहेरून धावल्याने बेल्हेत समस्या

बेल्हे, पुढारी वृत्तसेवा : मुंबई-विशाखापट्टनम राष्ट्रीय महामार्गावर बेल्हे येथे लांब पल्ल्याच्या एसटी बसेस गावाबाहेरून बाह्य वळणावरून धावत असल्याने, एसटी महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

बेल्हे आठवडे बाजार दिवशी सर्वच एसटी चालक-वाहक गावात गाडी घालण्याऐवजी गावाबाहेर दोन किलोमीटर बाह्य वळणावरून धावतात. परिणामी परिसरातील प्रवासी एसटीऐवजी खासगी अवैध वाहतूक करणार्‍या गाड्यांतून प्रवास करतात. त्यातून एसटी महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी याविषयी दक्षता घ्यावी, अशी मागणी बेल्हे ग्रामस्थ करीत आहेत.

एसटी महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या बस बेल्हेसारख्या पंधरा हजार लोकसंख्या तसेच चाळीस गावांची प्रमुख बाजारपेठ असलेल्या गावात एसटी बस थाबणे, गावात येणे अपेक्षित असताना, चालक-वाहकाच्या मनमानीमुळे त्या गावाबाहेरील बाह्य वळणावरूनच सुसाट निघून जात आहेत.

दरम्यान, बेल्हे परिसरात बिबट्याचा असलेला मुक्त संचार आणि बिबट्याच्या हल्ल्यामुळे बिबट्याची मोठी दहशत आहे.
परिसर बिबट्याप्रवण क्षेत्र म्हणून केंद्र सरकारने घोषित केला असल्याने, त्याची दक्षता नागरिक घेत असले, तरी एसटी महामंडळाचे चालक-वाहक प्रवाशांना बिबट्याला आयते सावज देत असल्याचे बोलले जात आहे.

Back to top button